ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात शिक्षक सत्कार समारंभ

IMG 20190907 WA0022

जळगाव, प्रतिनिधी | ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात पालक शिक्षक संघातर्फे वार्षिक बक्षीस वितरण आणि शिक्षक सत्कार समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता.

यावेळी पालक शिक्षक संघातर्फे घेण्यात आलेल्या पठण स्पर्धा, वाक्र्तुत्व स्पर्धा स्मरणशक्ती स्पर्धा या विविध स्पर्धा मधील विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. बी. एड. अंतरवासिता शिक्षकांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा वैशाली चौधरी होत्या. कार्यक्रमाला मुख्याध्यापक डी. व्ही. चौधरी, शालेय समन्वयक के. जी. फेगडे, पालक शिक्षक संघाचे सदस्य सोनाल पाटील, हेमंत ठाकूर, उत्तरा सपकाळे, बळवंत मोरे, मनीषा बारी, शुभांगी बारहाते, वैशाली थोरवे, अर्चना पाटील, वैशाली कोठावदे, पूनम चौधरी, बाजीराव साळुंके, उपस्थित होते. आभार पूनम कोल्हे यांनी मानले.

Protected Content