अरविंद केजरीवालांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट

kejriwal and amit shaha

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज (बुधवार) त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत केजरीवाल विरुद्ध अमित शाह असा सामना रंगला होता. त्यामुळे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर केजरीवाल आणि अमित शाह यांची पहिल्यांदाच होणाऱ्या भेटीचे महत्व वेगेळे आहे. दिल्लीला राज्याचा दर्जा नाहीए आणि कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ही केंद्र सरकारच्या हाती आहे. केजरीवाल सरकारच्या पहिल्या कार्यकाळात केंद्र आणि दिल्ली सरकारमध्ये जोरदार आरोप- प्रत्यारोप झाले. पण यावेळी केजरीवाल यांनी केंद्राकडे सहकार्याची अपेक्षा केली आहे. दरम्यान, या भेटीत कोण-कोणत्या विषयावर चर्चा झाली, याचा तपशील मात्र, मिळू शकला नाही.

Protected Content