शिशूंसाठी वरदान ठरतेय जळगावातील मदर्स मिल्क बँक ( व्हिडीओ )

mothers milk bank

जळगाव जयश्री निकम । शहरातील छत्रपती शाहू महाराज रूग्णालयात मदर्स मिल्क बँक कार्यरत असून या माध्यमातून अनेक शिशूंना मातेचे दुध पुरविण्यात येत आहे.

जळगाव पीपल्स बँकेच्या रामदास पाटील स्मृती सेवा संचलीत छत्रपती शाहू महाराज हॉस्पीटलमध्ये अत्यल्प दरात विविध रोगांवर उपचार उपलब्ध आहेत. याच्या जोडीला मार्च महिन्यापासून मदर्स मिल्क बँकदेखील सुरू करण्यात आली आहे. हा प्रकल्प रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या सहकार्याने कार्यान्वित करण्यात आला असून नावातच नमूद असल्यानुसार यातून मातेचे दुध उपलब्ध करण्यात आले आहे. काही कारणांमुळे मातेचे निधन झाल्यामुळे बाळास दूध मिळणे शक्य होत नाही. तर काही महिलांना आवश्यक असणारे दूध येत नाही. मग त्यावेळेस मिल्क पावडर वापरली जाते. परतू काही बालकांना ती पावडर पचत नाही त्यामुळे नवजात शिशूंना त्याचा त्रास होतो. या पार्श्‍वभूमिवर, मदर्स मिल्क बँक हे वरदान ठरणार आहे. या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी वेळोवेळी जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. या अनुषंगाने नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या अध्यक्षा संगीता पाटील यांच्यासह डॉक्टर प्रीती जोशी, डॉक्टर सुमन लोखंडे आणि महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. त्यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत माहिती दिली.

पहा : मदर्स मिल्क बँकेबाबतची माहिती.

Add Comment

Protected Content