देशद्रोही व सुपारीबाजांना पाठिंबा देणे हीसुद्धा ‘हरामखोरी’च- शिवसेना

मुंबई प्रतिनिधी । राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा ‘हरामखोरी’च म्हणजे मातीशी बेइमानीच असल्याचे सांगत शिवसेनेने आज जोरदार टोला लगावला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनामध्ये आज भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, मुंबई महाराष्ट्राचीच आहे. ती मुंबईत इमानाने राहणार्‍या सर्वांची आहे. कारण ती हिंदुस्थानची आहे, पण ती आधी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची आहे. म्हणूनच ती हिंदुस्थानची आहे. त्यामुळे मुंबईची तुलना ङ्गपाकव्याप्तफ कश्मीरशी करणे व मुंबई पोलिसांना माफिया वगैरे हिणवून खाकी वर्दीचा अवमान करणे हे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे. महाराष्ट्रातील ११ कोटी मर्‍हाटी जनतेस तर हा असा मुंबईचा अवमान म्हणजे देशद्रोहासारखा गुन्हा वाटतो, पण असा गुन्हा करणार्‍या व्यक्तीच्या मागे राष्ट्रभक्त मोदी सरकारचे गृहमंत्रालय सुरक्षा कवच घेऊन ठामपणे उभे राहते तेव्हा आपले १०६ हुतात्मेही स्वर्गात अश्रू ढाळत असतील. भारतीय जनता पक्ष मुंबईचा आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अवमान करणार्‍यांना सरळ पाठिंबा देत आहे.

यात पुढे म्हटले आहे की, मुंबईवर हक्क सांगण्यास यानिमित्ताने बरेच जण पुढे आले आहेत, पण मुंबई हा ङ्गमुंबाईफ देवीचाच प्रसाद आहे. अशा देवी स्वरूप आईची तुलना पाकव्याप्त भागाशी करून आमच्या देवीचाच अवमान केला. हिंदुत्वाचा आणि संस्कृतीचा, धर्माचा आणि १०६ हुतात्म्यांच्या त्यागाचाच अवमान केला व असा अवमान करून छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रावर नशेच्या पिचकाऱया टाकणाऱया व्यक्तीला केंद्र सरकार विशेष सुरक्षेच्या पालखीचा मान देत आहे. देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदी किंवा गृहमंत्री शहा यांचा एकेरी नावाने उद्धार करणार्‍या टिनपाट वृत्तवाहिनीच्या मालकास भाजपवाल्यांनी असा पाठिंबा दिला असता काय? असा प्रश्‍न यात विचारण्यात आला आहे.

यात नमूद केले आहे की, आज शिवसेनेने वेगळी वाट निवडली असली तरी ङ्गपंतप्रधानफ म्हणून मोदींचा अवमान कदापि सहन करणार नाही. मोदी हे आज एक व्यक्ती नसून पंतप्रधान म्हणून ङ्गसंस्थाफ आहे. तेच राज्याराज्यांच्या मुख्यमंत्र्यांबाबत आणि राज्यांच्या प्रांतिक अस्मितेबाबत बोलता येईल. राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा हरामखोरीच म्हणजे मातीशी बेइमानीच आहे. महाराष्ट्रातील बेइमानांच्या पाठीशी जे उभे राहात आहेत, त्यांना १०६ हुतात्म्यांचे तळतळाट लागतीलच, पण राज्याची ११ कोटी जनताही माफ करणार नाही! मुंबाई मातेचा अवमान करणा़र्‍यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील. बेइमान लेकाचे! या मंडळींनी आता राष्ट्रभक्तीचे तुणतुणे वाजवू नये इतकीच अपेक्षा! असे यामध्ये म्हटले आहे.

Protected Content