Home राजकीय प्रहार जनशक्तीच्या दोघा आमदारांचा शिवसेनेला पाठींबा

प्रहार जनशक्तीच्या दोघा आमदारांचा शिवसेनेला पाठींबा

0
28

jalgaon Shivsena

मुंबई प्रतिनिधी । बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या दोन आमदारांनी आज शिवसेनेला पाठींब्याचे पत्र दिले आहे.

बच्चू कडू यांनी आधीच मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरे यांची भेट घेतली होती. आज त्यांनी पुन्हा मातोश्रीवर जाऊन स्वत:सह आपले सहकारी तथा मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांचा पाठींबा शिवसेनेला दिला. या पाठींब्याचे पत्र त्यांनी आज पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना प्रदान केले. याप्रसंगी एकनाथ शिंदे यांची उपस्थितीदेखील होती. याआधी रामटेकचे आशिष जैसवाल आणि भंडार्‍याचे नरेंद्र भोंडेकर यांनीही शिवसेनेला पाठींबा दिला आहे. परिणामी शिवसेनेकडे आता एकूण ६० सदस्यांचा पाठबळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.


Protected Content

Play sound