दुचाकीच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू

mayat tarun mundane

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील मुंदाणे प्र. अ. येथे पायी जाणार्‍या तरुणास मोटरसायकलने मागाहून जबर धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

तालुक्यातील मुंदाणे प्र. अ. येथील दिनकर मच्छिंद्र पाटील वय ३५ हा मुंदाने रोडवर पायी चालत असताना अचानक सोके गावाकडून पारोळ्याकडे जाणार्‍या मोटरसायकल क्रमांक एमएच-१८ वाय ७७९८ क्रमांकाच्या टिव्हीएस दुचाकीने पाठीमागून जबर धडक मारून मोटरसायकल चालक जागेवरूनच फरार झाला. तर दिनकर पाटील याच्या डोक्यात जबर मार लागल्याने त्याला खाजगी वाहनाने पारोळा येथे कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यास तपासून डॉक्टर योगेश साळुंखे यांनी मयत असल्याचे घोषित केले.

याबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध अमोल दगडू पाटील (रा मुंदाने प्र. अ.) यांच्या फिर्यादीवरून मोटरसायकल चालकाविरूध्द भाग ५ गु र न ३०४(अ), २७९, ३३७,३३८, १८४, १३४ (ब)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Protected Content