हरियाणात मनोहरलाल खट्टर सरकारचा शपथविधी

khattar shapathvidhi

चंदीगड वृत्तसंस्था । हरियाणात लागोपाठ दुसर्‍यांदा मनोहरलाल खट्टर यांचे सरकार सत्तारूढ झाले असून आज या सरकारचा शपथविधी झाला.

हरयाणाच्या मुख्यमंत्रिपदी मनोहरलाल खट्टर यांनी, तर उपमुख्यमंत्रिपदी दुष्यंत चौटाला यांनी आज शपथ घेतली. राजधानी चंदीगडमध्ये हा शपथ सोहळा पार पडला. राज्यपाल सत्यनारायण आर्य यांनी खट्टर आणि चौटाला यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. सोहळ्याला हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत, अकाली दलाचे प्रमुख प्रकाश सिंग बादल, माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा आणि दुष्यंत यांचे वडील अजय चौटाला यांची उपस्थिती होती.

या माध्यमातून हरियाणात आता भाजप आणि जननायक जनता पार्टी अर्थात जेजेपीच्या आघाडीचे सरकार सत्तारूढ झाले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत नसल्याने त्यांना सत्तेसाठी जेजेपीची मदत घ्यावी लागली आहे.

Protected Content