शिवाजीनगर हुडकोत एकाची दुचाकी जाळली; शहर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिवाजीनगर हुडकोतुन व्यावसायिकाची दुचाकी जाळल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, शिवाजीनगर येथे नीरज दत्तराजसिंग परदेशी (वय-२४) हे कुटुंबियासह वास्तव्याला आहे. ते रविवारी २० मार्च रोजी  शिवाजीनगरात हुडकोत गेले होते. या ठिकाणी एका इमारतीसमोर त्यांनी त्यांची (एम एच १९ डी डब्ल्यू  ४१४३) या क्रमांकाची दुचाकी उभी केली होती. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास ही दुचाकी कुणीतरी जाळल्याचे समोर आले. घटनेत दुचाकी पूर्ण जळून खाक झाली असून ५५ हजारांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी नीरज परदेशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलिस नाईक वैशाली पावरा या करीत आहेत.

 

Protected Content