भादलीजवळ रेल्वेच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील भादली गावाजवळ ४० वर्षीय तरूणाचा रेल्वेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी नशीराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अफसर अली रमजान अली वय 40 रा. नशीराबाद ता. जि.जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील भादली जवळ डाउन रेल्वेलाईनवर खांबा क्रमांक 429/19एमएल याठिकाणी रेल्वेच्या धडकेत अफसर अली रमजान अली याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी २० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. घटनेची माहिती मिळाल्यावर नशीराबाद पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तरुणाची ओळख पटविली असता मयत नशीराबाद येथील अफसर अली रमजान असे असल्याचे समोर आले. मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्‍यात आला. याप्रकरणी नशीराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्‍यात आली आहे. पुढील तपास स. फौ. संजय जाधव करीत आहेत.

 

Protected Content