अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापतींची वाहने प्रशासनाकडे झाली जमा (व्हिडिओ)

जळगाव,  लाईव्ह ट्रेंड्स नुज प्रतिनिधी – जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाल २० मार्च रोजी संपुष्टात येताच जि. प.अध्यक्ष, उपाध्यक्षांसह अन्य सभापतींची वाहने प्रशासनाकडे जमा करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.

 

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाल संपुष्टात आला असून बऱ्याच ठिकाणी प्रशासक नेमण्यात आले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या गट, गणाच्या प्रारूप आराखडा रचनादेखील प्रशासनाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला होता. परंतु ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्यात येऊ नयेत यामागणीवरून राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाच्या नव्याने अध्यादेश पारित केला. या अध्यादेशावर राज्यपालांनी स्वाक्षरी करण्यात आली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात सर्वच प्रारूप आराखडा रचना रद्द करण्यात आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडल्या आहेत. तसेच जिल्हा परिषदेचा सन २०१७ ते २०२२ चा पंचवार्षिक कालावधी २० मार्च रोजी संपुष्टात आल्यामुळे जिल्हा परिषदेवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह ४ सभापतींची वाहने लागलीच जिल्हा परिषद प्रशासनाकडे जमा करण्यात आली आहेत.
यात जिल्हा परिषद अध्यक्षांकडे असलेले होंडा सिटी एमएच १९ सीव्ही ११६१, उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापतींकडील एमएच १९ सीयु ६५७७, शिक्षण आरोग्य सभापतीचे एमएच १९ सीयु ५७४७, महिला बाल कल्याण व बांधकाम समिती सभापतीचे एमएच १९ सीयु ५७४६, समाजकल्याण सभापतीचे एमएच १९ सीयु ५७६७, आरोग्य समिती सभापतीचे एमएच १९ एम ६९०, अशी प्रशासकीय वाहने जिल्हा परिषद प्रशासनाकडे जमा करण्यात आली असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली.

 

 

Protected Content