तीन लाखासाठी विवाहितेचा छळ; पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । वाहन घेण्यासाठी माहेरहून ३ लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अयोध्या नगरातील माहेर असलेल्या मनिषा रमेश महाजन या विवाहितेचा भडगाव येथील रमेश हिरालाल महाजन यांच्याशी रितीरिवाजाप्रमाणे १३ फेब्रुवारी २००६ मध्ये लग्न झाले. लग्नानंतर दोन वर्षे सर्वांनी चांगली वागणूक दिली. त्यानंतर पती रमेश महाजन याने विवाहितेला माहेरहून गाडी घेण्यासाठी तीन लाख रूपये आणावे यासाठी तगादा लावला. आईवडीलांची परिस्थीती हालाखीची असल्याने पैसे दिले नाही. त्यामुळे पती रमेश महाजन यांनी शिवीगाळ, मारहाण करण्यास सुरूवात केली. याला प्रोत्साहन म्हणून सासू, सासरे, दिर व नणंदे यांनी दिले. या छळाला कंटाळून विवाहिता जळगाव येथील माहेरी निघून आल्यात. त्यांनी एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती रमेश महाजन, सासू मिराबाई हिरालाल महाजन, सासरे हिरालाल बळीराम महाजन, दिर प्रकाश हिरालाल महाजन सर्व रा. भडगाव जि.जळगाव आणि नणंद गिता जयवंत माळी रा. मालेगाव जि. नाशिक यांच्याविरेाधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अतुल पाटील करीत आहे.

Protected Content