पाटणा देवी जंगलात एकाचा खून; चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पाटणा जंगलात गुरेढोरे सांभाळणाऱ्या एका ५० वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.  याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील गणेशपूर येथील नाना उर्फ ज्ञानेश्वर संतोष पाटील (वय-५०) हा पाटणा जंगलात गुरेढोरे  सांभाळण्याचे काम करीत होता. दरम्यान नेहमीप्रमाणे तो गुरेढोरांची सांभाळ करीत असताना अज्ञात इसमाने त्याचे हात-पाय बांधून धारधार शस्त्राने डोक्याच्या मागच्या बाजूला वार करून निर्घृण हत्या केली. हि थरारक घटना ५ ऑक्टोबर सकाळी ८:३० ते ६ ऑक्टोबर सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. काही एक कारण नसताना नाना उर्फ ज्ञानेश्वर संतोष पाटील याची हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हत्याराचे तपास ग्रामीण पोलीसांकडून युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली आहे. निलेश ज्ञानेश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे हे तपास करीत आहेत.

Protected Content