फैजपूर येथील जे.टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्राप्त

फैजपुर प्रतिनिधी । येथील जे. टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेजची उज्वल यशाची परंपरा विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या काळात सुद्धा कायम ठेवलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, डी बाटु, लोणेरे द्वारा मागील वर्षी घेतल्या गेलेल्या विद्यापीठ परीक्षेमध्ये एमटेकच्या दोन विद्यार्थ्यांना मेकॅनिकल विभागातून प्रथम क्रमांकाचा बहुमान म्हणून सुवर्णपदक प्राप्त झालेले आहे.

सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थ्यांची नावे जयेश सरोदे व दुर्गेश ठोंबरे तसेच विविध शाखांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे. कॉम्प्युटर इंजिनीअरिंग विभागातून प्रथम क्रमांक विकास कुमार 9.68, द्वितीय क्रमांक इंगळे लीना केशव 9.09,तृतीय क्रमांक चौधरी देवयानी संजय 9.07 यांनी प्राप्त केले आहे.सिव्हिल इंजिनिअरिंग या शाखेमध्ये टेंपे तुषार कैलास 9.17,द्वितीय क्रमांक गायत्री धांडे 9.16, व तृतीय क्रमांक प्राजक्ता राणे 9.11, मेकॅनिकल इंजिनियरिंग या विभागात प्रथम क्रमांक महाजन लीना किशोर 9.15, द्वितीय क्रमांक पाटील ज्ञानेश्वर संजय 9.01,व तृतीय क्रमांक उमेश झोपे 8.98, इलेक्ट्रॉनिक अँड टेली कॉम इंजीनियरिंग विभागातून प्रथम क्रमांक फेगडे पौर्णिमा ज्ञानदेव 9.35, द्वितीय क्रमांक भंगाळे टीना प्रमोद 9.21 व नेमाडे चारुशीला रूपचंद 9.21 तृतीय क्रमांक जावळे नेहा राजेश 9.18 असे गुण प्राप्त झालेले आहेत.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष शरद महाजन ,उपाध्यक्ष उल्हास निंबा चौधरी, मार्तंड भिरुड, सचिव विजय झोपे,सोनू गोमा भंगाळे, सर्व संचालक मंडळ,प्र प्राचार्य डॉ एन डी नारखेडे, डीन अकॅडमिक डॉ पी एम महाजन, विभाग प्रमुख डॉ डी ए वारके,डॉ ए एम महाजन, डॉ के एस भगत,प्रा डी आर पाचपांडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याद्वारेअभिनंदन केले जात आहे.

Protected Content