शिंदाड येथे तरुणांना स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शन

 

पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातील शिंदाड येथे तरुणांना स्पर्धा परीक्षेची पुर्व तयारी कशी करावी ? याबाबत मोफत मार्गदर्शन करण्यात आले.

डॉ. भूषण मगर युवा फाउंडेशनतर्फे हे मार्गदर्शनपर शिबीर शिंदाड ता. पाचोरा समाज विकास विदयालयात घेण्यात आले. ह्या शिबिराचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, डॉ. भूषण मगर, उपसरपंच नरेंद्र पाटील यांचे हस्ते करण्यात आले. गावातील शेकडो तरुणांना स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याबाबत जळगांव येथील प्राध्यापक अनिल सुर्वे पाटील यांनी मार्गदर्शन केले.

ग्रामीण भागातील आहोत म्हणून खचून न जाता एकाग्रता व परिस्तितीची जाणीव ठेवून अभ्यास केला तर यश निश्चित मिळते. त्यामुळे न डगमगता चिकाटी सोडू नये असे आव्हान करून भविष्यात शिंदाड गावातील तरुणांसाठी मोफत मार्गदर्शन करण्यात येईल असे आश्वाशीत केले. यावेळी डॉ. भूषण मगर जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे उपसरपंच नरेंद्र पाटील यांनी तरुणांना मार्गदर्शन केले.

यावेळी ग्राम पंचायत सदस्य संदीप सराफ, विलास पाटील, स्वप्नील पाटील, धनराज पाटील, विजय पाटील, श्रीराम धनगर, राजेंद्र परदेशी उपस्तीत होते. शिबिर यशस्वीतेसाठी काशीनाथ चौधरी, भूषण सोनार, गजानन पाटील, तेजस परदेशी, आधार तांबे यांनी सहकार्य केले. यावेळी गावातील नागरिक व तरुण उपस्थीत होते.

Protected Content