14 वा वित्त आयोग व लोकवर्गणीतून शाळेचे सुशोभीकरण

अमळनेर प्रतिनिधी | ‘आमची जि .प.शाळा आमचा अभिमान’ ही संकल्पना समोर ठेवत अमळनेर तालुक्यातील दहिवद ग्रामपंचायतने गावातील जि प.शाळेचे १४ वा वित्त आयोग निधी व लोकवर्गणीतून नितुनीकरणासोबतच सुशोभीकरण केले आहे.

येथील जि.प.शाळा १८९१ साली स्थापित झाली या शाळेतील जीर्ण झालेल्या इमारत १ व २ चे नुतनीकरण व सुशोभीकरण ग्रामपंचायत १४ वा वित्त आयोग निधी व लोक वर्गणीतून करण्यात आले. नूतन इमारतीचे उदघाटन डॉ प्रशांत पाटील, कुलगुरू कृषी विद्यापीठ राहुरी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्या जयश्री पाटील या अध्यक्षस्थानी होत्या.

याप्रसंगी राहुरी कृषी विद्यापीठचे कुलगुरू डॉ.प्रशांत पाटील म्हणाले की, “आमची शाळा आमचा अभिमान” ही संकल्पनाच मुळात भन्नाट आहे. दहिवद गावची जि प शाळा तालुक्यातील इतर शाळांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. तालुक्यातील सर्वच शाळांनी हि संकल्पना अवलंबली तर त्या शाळांना देखील गतवैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.

यानिमित्ताने गावात विविध विकास कामाचं उद्घाटन पार पडले. महिला बचत गट सभागृहाचे उद्घाघाटन जयश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. लोकनियुक्त सरपंच सुषमा देसले यांचे वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचेही उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रम जिल्हानियोजन अधिकारी निलेश भदाणे, प्राथमिक गट शिक्षण अधिकारी श्री.महाजन, मा.सभापती शाम अहिरे, दिनेश पाटील, जयवंत पाटील, वासुदेव देसले पाटील वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सुरेश भदाणे, कोपरगाव भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, राष्ट्रवादी तालुका युवक उपाध्यक्ष शिरीष पाटील, पाणी फौंडेशनचे श्री.भोसले, लोकनियुक्त सरपंच सुषमा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला

यावेळी सुभाष देसले उपसभापती पं.स.अमळनेर, उपसरपंच बाळू पाटील, मा.उपसरपंच वैशाली माळी, मा.उपसरपंच सुनिल पाटील, गटनेता-सदस्य शिवाजी पारधी, सदस्य देवानंद बहारे, सदस्य वर्षा पाटील, सदस्य रेखाबाई पाटील, सदस्य रवींद्र माळी, न भा माध्यमिक विद्यालयाचे उपाध्यक्ष दत्तात्रय देसले, पोलीस पाटील प्रतिभा देसले, मा. उपसरपंच प्रवीण काशिनाथ माळी, मा.उपसरपंच प्रवीण माळी, व्यवस्थापन समितीचे जिजाबराव माळी, दहिवद विकास मंचचे गोकुळ माळी, किशोर पाटील, सुकलाल पारधी, बापू सोनवणे, संजय देसले, ईसवर माळी, संदीप देसले, प्रा.उमेश भदाणे, भूषण भदाणे, ग्रामविकास अधिकारी सोनवणे, तालाठी महेंद्र पाटील, कोतवाल प्रदीप देसले, ठेकेदार अमोल पवार जि.प.शाळेचे मुख्याध्यापक भिकन पवार व शिक्षकवृद गावातील बचत गटाच्या भगिनी, ग्रामस्थ व परिसरातील पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content