झायडस कॅडिलाच्या लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । सरकारी तज्ञ्जांच्या समितीने झायडस कॅडिलाच्या तीन डोस असलेल्या ‘जॉयकोव्ह-डी’ लसीला परवानगी देण्याची शिफारस केली होती. त्यानंतर लसीला मंजुरी देण्यात आली आहे.

 

देशात स्वदेशी बनावटीच्या तिसऱ्या कोरोना लसीला मान्यता मिळाली आहे. केंद्रीय औषध नियंत्रण मंडळाच्या समितीने जॉयकोव्ह-डीला मंजुरी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या लसीला मंजुरी मिळाल्याने ही भारतात वापरली जाणारी सहावी लस आहे. आतापर्यंत सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक व्ही, अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन जॉन्सनच्या सिंगल डोस असलेल्या लसीला परवानगी दिली आहे.

 

भारतात लसीची सर्वात मोठी चाचणी घेतली गेली आहे. ५० पेक्षा जास्त केंद्रांवर या लसीची चाचणी घेण्यात आली होती. भारतीय कंपनीने तयार केलेली जगातील पहिली डीएनए लस आहे, असा दावा जॉयडसने केला आहे.जॉयकोव्ह-डी ही जगातील पहिली डीएनए आधारीत लस आहे. तसेच या लसीचे तीन डोस देणं आवश्यक आहे. अहमदाबादमधील फार्मास्युटिकल कंपनी असेल्या झायडस कॅडिलाने १ जुलै रोजी जॉयकोव्ह-डी लसीच्या आपत्कालीन वापरासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे मंजुरी मागितली होती.

 

 

Protected Content