ओरीयन शाळेच्या आवारातून लांबविली दुचाकी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील ओरीयन शाळेच्या आवारातून एकाची दुचाकी लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी २३ मे रोजी सायंकाळी ७ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की,  जळगाव शहरातील जोशी पेठेतील डिगंबर मन्साराम वाणी (वय-४९) यांच्याकडे (एमएच १९ सीसी ४२४८) क्रमांकाची दुचाकी आहे.  १० मे रोजी त्यांनी दुचाकी ओरीयन शाळेच्या कंपाऊंट वॉलच्या आतमध्ये भिंतीलगत लावली हाती. दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरुन नेली. दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर डिगंबर वाणी यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर मंगळवारी २३ मे रोजी सायंकाळी ७ वाजता वाणी यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रेवानंद साळुंखे हे करीत आहे.

Protected Content