


मुक्ताईनगर प्रतिनिधी | जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सुचनेने मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारने वाढवलेल्या महागाईच्या विरोधात जनजागरण अभियान राबविण्यात आले आहे.
केंद्र सरकारने वाढवलेल्या विविध वस्तूंच्या वाढविलेल्या किमती, इंधन महागाईच्या विरोधात केलेल्या जनजागरण अभियानाची सुरुवात मुक्ताईनगर येथून करण्यात आली. सदर अकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे एस ए भोई हे होते. प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी सेल डॉ जगदीश पाटील, अॅड.अरविंद गोसावी, श्री.गवळी , ह भ प गुलाब महाराज, संजय पाटील, शांताराम कांडेलकर, पु स धायले , डॉ रोटे यांच्यासह हे अभियान राबविण्यासाठी बाळासाहेब पाटील, राजू जाधव, निलेश भालेराव, निखिल चौधरी, अनिल वाडीले, शेख भैया करीम, नामदेवराव भोई, हाजी सलिम मंत्री, संजय चौधरी, बाळू कांडेलकर, अॅड. राहुल पाटील, संजय धानोरे, गणेश पाखरे, ज्ञानेश्वर इंगळे व तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष दिनेश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.सुभाष पाटील यांनी तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष पवन खुरपडे यांनी केले


