अवघ्या तीन तासात हरविलेल्या बालकाचा शोध : पारोळा पोलिसांची कामगिरी !

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील बहादरपूर येथे पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या आदिवासी कुटुंबातील हरवलेल्या बालकांना शोध अवघ्या तीन तासात लावण्याची कामगिरी पारोळा पोलिसांनी बजावली आहे.

कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी मध्य प्रदेश येथील रहिवाशी व सद्यस्थितीत बहादरपूर तालुका पारोळा येथे कामासाठी आलेले प्रेमसिंग पावरा हे आपली पत्नी मंगिता पावरा आपल्या दीड वर्षाच्या आरुष सोबत शेतात कामाला गेले होते. मात्र तो झोक्यात दिसू न आल्याने पावरा परिवाराने त्याचा शोध घेतला असता तो मिळून न आल्याने अखेर पारोळा पोलिसांकडे त्यांनी धाव घेतली.

प्रेमसिंग पावरा व मंगिता पावरा हे शेतात काम करण्यासाठी जात असतात. घरी कोणी नसल्यामुळे अखेर ते दीड वर्षाचा मुलगा आरुष यालादेखील सोबत नेत होते. दरम्यान ता. ७ ऑक्टोंबर रोजी नेहमीप्रमाणे ते शेतात जाऊन सकाळी अकरा वाजेच्या झोक्यात झोपलेला आरुष  हा दिसेनासे झाला. त्यामुळे पावरा परिवाराने एकच हंबरडा फोडत मुलाचा शोध घेतला. मात्र तो सापडत नसल्यामुळे अखेर गावातील लोकांनी पारोळा पोलीस स्टेशनला संपर्क करून सदर घटनेची माहिती पोलिसात दिली. याबाबत पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता बहादरपूर बीट परिसरातील हवालदार सुनील हटकर व अभिजीत पाटील यांना घटनास्थळी पाठविले.

 

यावेळी दोघेही पोलीस कर्मचारी व शिरसोदे गावातील महिला उज्वला अरुण कोळी, प्रमिला दिलीप भोई , भटू किशोर कोळी व भास्कर केशव भोई यांनी परिसरात आरुषला शोधण्याचा प्रयत्न केला असता  पिंपळ भैरव शिवारातील रस्ता लगत  सदर मुलगा दिसून आला. यावेळी पोलिसांनी आरुषला वडील प्रेमसिंग पावरा व आई मंगिता पावरा यांचे स्वाधीन केले. यावेळी पावरा परिवाराने अखेर सुटकेचा निःश्वास सोडत आरुषला कड्यावर घेत कवटाळून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.

शेतकरी व शेतमजुरांनी काळजी घ्यावी- पोलीस निरीक्षक सुनील पवार

सध्या कापूस वेचणी सह शेतातील इतर कामांना वेग आला आहे. त्यामुळे शेतातील काम करीत असताना आपल्या सोबत असलेली लहान बालके यांची काळजी घेत होणारे गैरप्रकार कमी करावेत असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी केले आहेत. तसेच सणासुदीचे दिवस असल्यामुळे चोरीचे प्रमाण वाढले आहे. यासाठी तालुक्यातील नागरिकांनी दक्ष राहून गैरप्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी असेही ते म्हणाले.

उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांकडून कौतुक

दरम्यान अवघ्या दीड वर्षाच्या आयुष हा झोक्यातून अचानकपणे बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना मिळतात बहारपुर बीट हद्दीतील हवालदार सुनील हटकर व अभिजीत पाटील यांनी गावातील सहकार्‍यांच्या मदतीने आयुषचा शोध घेत त्यांच्या मुलगा पावरा कुटूंबियांच्या  स्वाधीन केला.त्यामुळे या दोघेही पोलीस कर्मचारी व त्यांना मदत करणारे गावातील महिला व पुरुषांचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील नंदवाळकर व पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी कौतुक केले.

Protected Content