रस्त्यांच्या सुधारणेसाठी २९० कोटींचा निधी; आ. चिमणराव पाटील यांचा पाठपूरावा

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा ते कजगांव ते भडगांव रस्त्याचा सुधारणेसाठी २९० कोटी रुपयांना मंजुरी मिळाली असून यासाठी आमदार चिमणराव पाटील यांच्या पाठपूराव्याला यश आले आहे.

पारोळा तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग, राज्य मार्ग, ग्रामीण मार्ग यांचेसह शेतरस्त्यांचा कामांना देखील आमदार चिमणराव पाटील यांनी प्राधान्य देऊन रस्त्यांचा सुधारणेसाठी पाठपुरावा केला आहे. यात आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या रस्त्यांचा सुधारणेसाठी ३५० कोटींपेक्षा जास्तचा निधी आम. चिमणराव पाटील यांनी योग्य त्या पाठपुराव्याने मतदारसंघाचा सर्वांगीण विकासासाठी मिळाला आहे.

आ. चिमणराव पाटील यांनी मतदारसंघात आणलेला निधीतून प्रथम प्राधान्य हे रस्त्यांचा कामांना दिले आहे. सद्यस्थितीला मतदारसंघात अनेक रस्त्यांची कामे सुरु आहेत. त्यातच आ.चिमणराव पाटील यांनी मोठी भर म्हणून पारोळा ते कजगांव ते भडगांव रस्त्याचा सुधारणेसाठी निधी खेचून आणला आहे. पारोळा-कजगांव-भडगांव रोड तसा अनेक दशकांपासून दुरावस्थेमुळे चर्चेत राहिला आहे. या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना फार जोखीमेने वाहन हाताळावे लागत होते. हा रस्ता जणू खड्यांचे माहेर घर झाल्यासारखे होता. अनेक दा या रस्त्याचा सुधारणेसाठी आमदार चिमणराव पाटील यांनी पाठपुरावा करून निधी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. परंतु अपूर्ण निधी, निधी कमतरता त्यामुळे ह्या रस्त्याचा पूर्ण विकास होवू शकला नाही. म्हणून आमदार चिमणराव पाटील हे सातत्याने ह्या रस्त्याचा सुधारणेसाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत होते. अखेर या पाठपुराव्याला अखेर यश संपादन झाले असून शासनाच्या ए.डी.बी.(Asian Development Bank) अंतर्गत पारोळा ते कजगांव ते भडगांव रस्त्याचा सुधारणेसाठी २९० कोटी रुपयांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे या संपूर्ण रस्त्याचा पूर्णपणे कायापालट होऊन, या कामांत रस्त्याचे १० मीटर रुंदीकरण, डांबरीकरण, मजबुतीकरण, काँक्रीटीकरण या कामांचा समावेश आहे. यामुळे दळणवळणासाठी मोठी मदत होणार आहे.

Protected Content