चोपडा रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरूवात !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा, यावल आणि रावेर या तीन तालुक्यांना जोडणाऱ्या यावल ते चोपडा रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतर बंद झालेल्या कामाला पुन्हा एकदा सुयवात करण्यात आली आहे.

गुजरात आणी मध्यप्रदेश या दोन शेजारच्या राज्यांना जोडणारा व वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या यावल ते चोपडा या राज्य महामार्गावरील ४५ किलोमिटर रस्त्याची मागील काही वर्षापासून ठिकठीकाणी मोठमोठी खड्डे निर्माण झाल्याने अत्यंत बिकट अवस्था झाली होती. याबाबत लाईव्ह ट्रेंड न्युजच्या माध्यमातुन सातत्याने रस्त्याच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. दरम्यान वाहन चालकांना भयावह करून सोडणाऱ्या व अपघाताच्या माध्यमातुन अनेक निरपराध नागरीकांचे बळी घेणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, यासाठी अनेक राजकिय पक्ष व सामाजीक व शैक्षणीक संस्थानी आंदोलन करावे लागले होते, अखेर प्रशासन व शासकीय यंत्रणा जागे होवुन लोकप्रतिनिधींच्या माध्यमातुन रस्ता दुरूस्तीचा निधी मंजुर झाल्यावर काही दिवसापुर्वीच कामास सुरुवात करण्यात आली होती मात्र संबधीत ठेकेदार हा रस्ता दुरूस्ती थातुरमातुर करीत असल्याचे भाजपाचे जिल्हा परिषदच्या शिक्षण समितीचे माजी सभापती रविन्द्र (छोटु) पाटील आणि जिल्हा परिषदचे माजी गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी प्रत्यक्ष या कामांवर जवुन पाहणी केली असता सदर दुरुस्तीचे काम निकृष्ठ प्रतीचे होत असल्याचे निर्देशनात आल्याने तात्काळ सदरचे काम बंद पाडले होते. दरम्यान काही दिवसाच्या प्रतिक्षेनंतर पुनश्च या कामास सुरूवात करण्यात आली असुन, आता तरी हे काम ठेकेदाराकडून गुणवत्तापुर्ण व्हावे अशी अपेक्षा परिसरातील नागरीक व वाहनधारकांकडून केली जात आहे.

Protected Content