जळगावात अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई

jalgaon 5

 

जळगाव प्रतिनिधी | शहरात अवैधरित्या गौण खनिजची वाहतूक बंद असताना देखील मध्यरात्री 12 ते सकाळी 6 वाजे दरम्यान शहरात अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर आज कारवाई करण्यात आले असून ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात पंपिंग रोड दरम्यान आज दोन ट्रॅक्टरमध्ये अवैधरित्या खडी वाहून नेणाऱ्या वाहनांची चौकशी केली असता त्यांच्याकडे वाहतुकीचा कुठलाही परवाना नसल्याचे आढळून आले, कागदपत्र नसल्यामुळे दोन्ही वाहनांवर कारवाई करण्यात आली असून दोन्ही ही ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले आहे. याचवेळी एमसिबीचे काम करण्यासाठी लागणाऱ्या सामानासह एका ट्रॅक्टरला देखील पकडले आहे. दरम्यान ट्रॅक्टर वरील कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार, एम.एस.सी.बीने परवानगीनुसार कामासाठी लागणारे वाढदेखील आणले आहे. यासाठी ते ट्रॅक्टर देखील जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले असून कागदपत्रांची चौकशी सुरू आहे.

या तीन वाहनांवर केली कारवाई
एमएच 15 इएस 3055 व त्याचे विना नंबरचे ट्रॉली यामध्ये एमएससीबीचे काम जोडण्याचे सामान विद्युत तारा आणि काही वाळू आढळून आली. एमएच 19 बीजी 2981 व त्याचे ट्रॉली क्र. एमएच 19 सीवाय 2991, आणि एमएच 19 सी 4665 त्याचे ट्रॉली क्रमांक एमएच 19 पी 5092 या ट्रॅक्टरमध्ये अवैधरित्या खडी वाहून नेत असल्यामुळे त्यावर कारवाई करत ट्रक्टर जप्त करण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई
जळगाव मंडळ अधिकारी योगेश नन्नवरे, अव्वल कारकून अतुल सानप, लिपिक जगदीश धमाले, जळगाव शहर तलाठी वडनेरे आप्पा, तलाठी वंजारी, तलाठी भोळे, सुधाकर पाटील यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

Protected Content