कर्तव्यात कसूर करणऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना करणे दाखवा नोटीस

image1

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील प्राथमिक शाळा, अंगणवाडी, प्राथमिक अरोग्य केंद्र यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी  गुरुवार ४ एप्रिल रोजी भेट दिली असता त्यांना तेथील कर्मचारी अनुपस्थित आढळल्याने त्यांना करणे दाखवा नोटीस बजावली आहे.

 

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी आठ वाजून चाळीसमिनिटांनी असोदा  अंगणवाडीस भेट दिली असता त्यांना अंगणवाडीला कुलूप आढळून आले. तसेच तीघ अंगणवाडी कर्मचारी अनुपस्थित होते. यात अंगणवाडी सेविका मंगला सुधीर चौधरी ह्या आठ वाजून पन्नास मिनिटांनी हजर झाल्या. तर दोघ मदतनीस अनुपस्थित होत्या. कर्तव्यात कसूर केल्याने अंगणवाडी सेविका मंगला सुधीर चौधरींनसह अंगणवाडी मदतनीस वंदना संजय माळी, ज्योती प्रकाश पाटील यांना गट विकास अधिकारी एस. बी. सोनावणे यांनी करणे दाखवा नोटीस बजावली आहे.

 

असोदा येथे विना तारखेच्या आढळल्या उत्तरपत्रिका

मुख्य  कार्यकरी अधिकारी डॉ. पाटील यांनी आसोदा येथील जिल्हा परिषद शाळेला सकाळी ९ वाजता भेट दिली होती. यावेळी त्यांना जानेवरी २०१७ पासून आजपर्यंत शालेय पोषण आहार योजने अंतर्गत दैनदिन नोंदवही व प्रपत्र नोंदवहीवरील   नोंदींवर स्वाक्षऱ्या आढळल्या नाहीत. संबंधीत शिक्षाकांचे टिपण आढळले नाही.  यासोबतच डॉ. पाटील यांना विधार्थ्यांची उपस्थिती असमाधानकारक आढळून आली.  शिक्षकांनी विना तारखेच्या उत्तर पत्रिका दप्तरात ठेवलेल्या निदर्शनास आले असून त्याचे प्रयोजन काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. विध्यार्थ्याच्या उपस्थितीनुसार पोषण आहार शिजविला जात नसल्याचे दिसून आले. यातील गंभीरबाब म्हणजे केंद्रप्रमुखांनी, विस्तार अधिकारी (शिक्षण )  यांनी भेटीवेळी शेऱ्यात यांची नोंद केलेली नाही. त्यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट न देता शेरेबुकात नोंदी केल्याचे दिसून आल्याने विस्तार अधिकारी (शिक्षण) प्रतिभा सानप  केंद्रप्रमुखांनी भगवान वाघ, मुख्याधापक श्रीमती आर. आर. तडवी यांना गट विकास अधिकारी एस. बी. सोनावणे यांनी तिघांना  करणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

भादली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांसह कर्मचारीवर्ग अनुपस्थित

यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी सकाळी ९. २० मिनिटांनी भादली प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता त्यांना वैद्यकीय अधिकारी डॉ.      भूषण चौधरी हे अनुपस्थित दिसून आले. ते थोड्या वेळाने आरोग्य केंद्रात आले तर दुसरे वैद्यकीय अधिकारी डॉ. ठाकूर हे पूर्ण वेळ अनुपस्थित होते. दरम्यान, एन.एम. श्रीमती एस. जे. अत्तरदे, आरोग्य सहायक व्ही. डी. बोरसे, औषध निर्माण  अधिकारी जी. बी. निकम, आरोग्य सेवक डी. आर. ठाकूर, कनिष्ठ सहायक यु. पी. काकडे, एएनएम श्रीमती एस. आर. हिवरे, परिचर एस. बी. सोनवणे, एस. पी. लाडवंजारी, श्रीमती एस. पी. उपाटके हे कर्मचारी देखील अनुपस्थित आले आहेत. डॉ. भूषण चौधरी व डॉ. ठाकूर या  दोघासह नऊ कर्मचर्यांना   गट विकास अधिकारी एस. बी. सोनावणे यांनी करणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

उपशिक्षक यांना नोटीस 

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा असोदा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी भेट दिली असता त्यांना  उपशिक्षक चंपा सुरभान ठाकूर  ह्या कोणतीही परवानगी न घेता अनुपस्थित आढळल्याने  त्यांना करणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Add Comment

Protected Content