Home Cities यावल किनगावच्या इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

किनगावच्या इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । माध्यमिक शालांत परीक्षा २०२६ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यावल तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलने पुन्हा एकदा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यावर्षी शाळेतील सर्व ३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे.

या निकालात मोहित पाटील याने ८७.०० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. नयन पाटील हिने ८५.२० टक्के गुणांसह द्वितीय तर पृथ्ली सोनार हिने ८४.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला. याशिवाय प्रणित पाटील ८४.०० टक्के, साहिल ठोके ८३.०० टक्के, गीतांजली फालक ८१.०० टक्के, कुणाल सावंडे ८०.२० टक्के, यश जावडे ७९.४० टक्के आणि कार्तिक पाटील ७८.६० टक्के गुणांसह विशेष प्राविण्य मिळवले.

तसेच साई पाटील ७५.८० टक्के, दुर्गेश चौधरी ७४.६० टक्के, दिशा दुसाने ७३.४० टक्के, योगराज कोडी ७३.४० टक्के, शोहरात तडवी ७२.४० टक्के आणि गौरव पाटील ७०.६० टक्के गुण मिळवत यशस्वी ठरले. पार्थ तडवी आणि हर्ष पाटील यांनी प्रत्येकी ६९.४० टक्के गुण मिळवले, तर प्रतिक्षा पाटील ६८.८० टक्के, राज पाटील ६८.२० टक्के आणि मानसी पाटील ६८.०० टक्के गुणांसह उत्तीर्ण झाले.

भावेश पाटील ६७.४० टक्के, दिव्या पाटील ६७.२० टक्के, प्रणव वराडे ६६.६० टक्के, गौरव कोळी ६६.४० टक्के, निहाल मनियार ६६.२० टक्के, संकेत पाटील आणि लोकेश पाटील यांनी प्रत्येकी ६५.४० टक्के गुण मिळवले. जयेश पाटील ६३.६० टक्के, निलेश पाटील ६१.८० टक्के, दिक्षित पाटील ६०.६० टक्के, हर्षाली परिस्कर ५४.६० टक्के, गोपाल पाटील ५२.४० टक्के आणि यश पाटील ५०.४० टक्के गुणांसह उत्तीर्ण झाले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील, व्हा. चेअरमन सौ. शैलेजाताई विजयकुमार पाटील, सचिव मनीष विजयकुमार पाटील, मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंह पाटील, उपमुख्याध्यापक सुहास भालेराव, इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक मिलिंद भालेराव तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळेच गेल्या १५ वर्षांपासून शंभर टक्के निकालाची परंपरा अबाधित राहिल्याची भावना पालकांमधून व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound