प्रेमप्रकरणातून पोलिसाची आत्महत्‍त्या; महिला बीड पोलिसांच्या ताब्यात

crime 2

जळगाव प्रतिनिधी । पोलीस कॉन्स्टेबलने स्वत:वरच गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी बीड येथे घडली होती. याप्रकरणात सुसाईड नोटच्या आधारावरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जळगावातील तरूणीला अटक करण्यात येवून बीड येथील पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव येथे सेवा बजावल्यानंतर तीन महिन्यापुर्वी पोलीस कॉन्स्टेबल दिलीप प्रकाश केंद्रे (वय-34) रा. केंद्रेवाडी धावडी ता. अंबेजोगाई यांची बदली बीड येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकात रुजू झाले. मंगळवारी दिलीप केंद्रे पोलीस ठाण्यात आले त्यानंतर ते दुपारी कामानिमित्त बाहेर गेले. स्वामी समर्थ नगरातील कापसाच्या शेतात जावून साध्या वेशात स्वत:च्या रिव्हालव्हरने कानशिलाजवळ गोळी झाडून आत्महत्या केल्याचे सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आले.

दरम्यान त्यांनी आत्महत्या करण्यापुर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात जळगावातील पूजा गुलाब पाटील (३३, रा. जळगाव) आणि तिचा जळगावातील पोलीस प्रियकराचा नावाचा उल्लेख केला आहे. प्रेयसीच्या ब्लॅकमेलींगला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबल दिलीप केंद्रे यांनी पिस्तूलाने डोक्याला गोळी झाडून आत्महत्या केली. केंद्रे यांच्या पत्नी अनिता यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पूजा गुलाब पाटील हिच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बीड पोलीस जळगावात दाखल; संशयितास आरोपीस अटक
बीड येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर बीड येथील पोकॉ कैलास ठोके, पोना तुकाराम तांबारे, पोना विजय घोडके, महिला पोलीस कर्मचारी सौदरमल विद्या आणि वैशाली इंचके जळगावातील रामानंद नगर पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी रामानंद नगर पोलीस कर्मचारी रविद्र पाटील, संतोष गिते, उज्ज्वला पाटील यांच्या सहकार्याने पिंप्राळा हुडको येथे जावून संशयित आरोपी पूजा गुलाब पाटील हीला अटक केली आहे.

Protected Content