Home क्राईम जळगाव शहर व तालुक्यातून हद्दपार असलेल्या गुन्हेगाराला रामेश्वर कॉलनीतून अटक

जळगाव शहर व तालुक्यातून हद्दपार असलेल्या गुन्हेगाराला रामेश्वर कॉलनीतून अटक

0
101


जळगाव प्रतिनिधी । जळगाव प्रांताधिकारी यांच्या आदेशान्वये गणेशोत्सवात हद्दपार असलेल्या विशाल अहिरे या आरोपीला शनीवारी १८ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलिसांनी रामेश्वर कॉलनी येथील राहत्या घरातून अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हद्दपार असलेला आरोपी विशाल राजू अहिरे रा. आदित्य चौक, रामेश्वर कॉलनी, जळगाव या गुन्हेगाराला गणेशोत्सवात पोलीस प्रशासनाने हद्दपार केले होते. दरम्यान संशयित आरोपी विशाल आहिरे हा शनिवारी 18 सप्टेंबर रोजी रामेश्वर कॉलोनीत आलाअसल्याची माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना माहिती मिळाली, त्यानुसार त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटील, सतीश गर्जे, साईनाथ मुंडे यांनी कारवाई करत शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास हद्दपार असलेला आरोपी विशाल अहिरे चौक अटक केली. पोलीस कॉन्स्टेबल गोविंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एमआयडीसी पोलिस करण्यासाठी करत आहे.


Protected Content

Play sound