स्पेलिंगच्या चुकीवरून अपहरण , खंडणी , हत्येच्या गन्ह्यातील आरोपी पकडला

 

लखनौ : वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशातील एका आरोपीला पोलिसांनी त्याने पाठवलेल्या खंडणीच्या मेसेजमधील स्पेलिंग मिस्टेकचा धागा पकडत मोठ्या शिताफीने जेरबंद केलं आहे.

राम प्रताप सिंह असं या आरोपीचं नाव असून त्याने हरदोई येथील ८ वर्षीय चुलत भावाचं अपहरण करुन त्याच्या वडीलांकडे खंडणीचा मेसेज पाठवला. वेळेत पैसे न मिळाल्यामुळे रामप्रतापने आपलाच ८ वर्षीय चुलत भावाची हत्याही केली.

२६ ऑक्टोबररोजी रामप्रतापने आपल्या ८ वर्षीय भावाचं त्याच्या आजीच्या घरातून अपहरण केलं. त्याच दिवशी रामप्रतापने एका चोरीच्या मोबाईलवरुन अपहरण केलेल्या मुलाच्या वडीलांना धमकीचे मेसेज पाठवला. रामप्रतापचं शिक्षण कमी झालेलं असल्यामुळे त्याने इंग्रजीतून टाइप करताना दोन चुका केल्या. ‘Do lakh rupay Seeta-Pur lekar pahuchiye. Pulish ko nahi batana nahi to haatya kar denge.’ खंडणीसाठी पाठवलेल्या मेसेजमध्ये रामप्रतापने Sitapur चं स्पेलिंग Seeta Pur तर Police चं स्पेलिंग Pulish असं लिहीलं.

खंडणीचा मेसेज आल्यामुळे मुलाच्या वडीलांनी पहिले घाबरुन पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. परंतू मुलाबद्दल काहीच माहिती मिळत नसल्यामुळे वडीलांनी ४ नोव्हेंबर रोजी बेनीगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलाच्या तपासासाठी खास पथक तयार केलं. ज्या नंबरवरुन खंडणीचा मेसेज आला त्या नंबरवर पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण फोन बंद होता. यानंतर सायबर पोलिस दलाच्या मदतीने पोलिसांनी खंडणीचा मेसेज आलेल्या मोबाईल नंबरची माहिती शोधून काढली.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन पोलिसांनी १० संशयित आरोपींना ताब्यात घेतलं. या आरोपींना पोलिसांनी ‘Main police main bharti hona chahta hoon. Main Hardoi se Sitapur daud kar ja sakta hoon’ असं इंग्रजीतून लिहीण्यास सांगितलं. या १० संशयित आरोपींमध्ये रामप्रतापने सितापूरचं स्पेलिंग Seeta Pur आणि Police चं स्पेलिंग Pulish लिहीलं…ज्यावरुन पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली. हरदोईचे पोलीस अधिकक्षक अनुराग वत्स यांनी प्रसारमाध्यमांना याची माहिती दिली.

Protected Content