ब्राऊन शुगर प्रकरणात भुसावळचा आरोपी अटकेत

धुळे प्रतिनिधी | येथे आयजी यांच्या पथकाने टाकलेल्या धाडीत साडे सात लाख रूपयांची ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली असून यात भुसावळच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, धुळे शहरातील मोहाडी उपनगर परिसरातील हॉटेल रेसिडेन्सी जवळ थांबलेल्या तरुणाकडे बाऊन शुगर असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाने छापा टाकला. यात भुसावळ येथील राजू उर्फ सय्यद शेरू उडण नामक संशयितास ताब्यात घेत ५०० ग्रॅम वजनाचे ब्राऊन शुगर जप्त केले आहे. पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलीस पथकाने जप्त केलेले ब्राऊन शुगर जळगाव अथवा भुसावळ येथून आणल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तर चाळीसगावरोड परिसरातही या पथकाने कारवाई केली. या कारवाईत गांजाची रिक्षातून वाहतूक करणार्‍या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबद्दल मोहाडी व चाळीसगावरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Protected Content