भुसावळात अवैध गुटखा विक्री करणार्‍याला अटक

भुसावळ प्रतिनिधी । अवैध गुटखा विक्री करणार्‍या दुकानदाराला शहरातील बद्री प्लॉट भागातून बाजारपेठ पोलीस पथकाने अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, बद्री प्लॉट भागात विनोद भारंबे याच्या दुकानात गुटखा विक्री होत असल्याची गुप्त माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, सहायक अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मंगेश गोटला, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, प्रशांत सोनार, ईश्‍वर भालेराव यांच्या पथकाने त्याच्या दुकानावर छापा टाकला.

यात २२ हजार ३१५ रूपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त करत विनोद भारंबेला अटक केली. पोलिस कर्मचारी प्रशांत सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी पोलिसांनी भारंबेला अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक गोटला पुढील तपास करत आहेत.

Protected Content