शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील गांधीनगर भागात महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करून शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, फिर्यादी तुषार श्रीराम हिंगणे रा. तुकाराम नगर, गणेश बोरिंग मागे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १९ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास भास्कर मोरेश्वर सुरे यांच्याकडे कार्यालयातील कर्मचारी यांचेसह वीजबिल वसुली करण्यासाठी गेले असता निलेश टेंट हाऊस गांधी नगर जवळ उभा असतांना वीज ग्राहक भास्कर सुरे यांचा मुलगा तुषार सुरे मोटरसायकल वरून पत्नीसह फिर्यादी माझ्यासमोर आला. या एरिया मध्ये माझे घर दिसते का दुसऱ्यांची थकबाकी दाखवू का मै भष्ट्राचार निर्मूलन समिती का अध्यक्ष हू असे बोलून शिवी दिली. दमदाटी केली व अंगावर येऊन फिर्यादीच्या डाव्या गालावर चापटाने मारहाण करून दुखापत केली असून फिर्यादी महावितरण कंपनीचे करीत असलेले शासकीय कामात अडथळा निर्माण करून कामात प्रतिबंध केला म्हणून तुषार भास्कर सुरे यांच्या विरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरुन ००७९/२०२१ भादवी कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक करीत आहे.

Protected Content