पहूर येथून चोरीची दुचाकी एलसीबीने केली जप्त

जळगाव प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथे चोरीची दुचाकी स्थानिक गुन्हे शाखेने केली जप्त करण्यात आली आहे. चोरीची दुकाची एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

सविस्तर माहिती अशी की, गेल्या महिन्यात जामनेर तालुक्यात दुचाकी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीला आणला होता. यात दोन जणांना अटकही केली होती. संशयित आरोपी पारदर्शक उल्हास पाटील (वय-२२) रा. पिंपळगाव ता. जामनेर जि.जळगाव याने चोरीची दुचाकी पहूर येथील विनोद प्रल्हाद पाटील याला विक्री केली होती. दरम्यान चोरी दुकाची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केली असून दुचाकी एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

 

Protected Content