पारोळा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

 

पारोळा, प्रतिनिधी । तालुक्यात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून त्यांना एकेरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई देऊन ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी संघटनेतर्फे तहसीलदार अनिल गवांदे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनाचा आशय असा की, पारोळ्या तालुक्यात पावसाने जोरदार थैमान घातले आहे. नवीन नाल्यांना न भुतो न भविष्यती असा पुर बघावयास मिळत आहे. अशा परिस्थितीत अवकाळी व पर्जन्यवृष्टीमूळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तर कापूस पीक पूर्णतः नेस्तनाबूत झालेले आहे. कापसासह ज्वारी, मका, लिंबू पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. याअस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे पूर्णतः कंबरडे मोडले आहे. या नुकसानीचे तालुक्‍यात स्थानिक प्रशासनाला पंचनाम्याचे आदेश देऊन ालुक्‍यातील शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करुन एकरी ५० हजार रुपये एवढे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देऊन ओला दुष्काळ जाहीर करावा अशी शेतकरी संघटनेने मागणी केली तहसीलदार अनिल गवांदे यांना निवेदन करण्यात आली. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, उपाध्यक्ष पाटील, प्रवक्ते भिकनराव पाटील, प्रहार संघटनेचे महेश मोरे, छावा संघटनेचे विजय पाटील, नगरसेवक पी. जी. पाटील, प्रवीण पाटील, सचिन पाटील, राहुल पाटील, छोटू पाटील ालुक्‍यातील शेतकरी उपस्थित होते.

 

Protected Content