बायो डिझेल वाहतुकीच्या संशयावरून दोन टँकर जप्त

पारोळा प्रतिनिधी | बायो डिझेल वाहून नेत असल्याच्या संशयावरून पोलीस पथकाने दोन टँकर जप्त केले आहेत.

याबाबत वृत्त असे की, महामार्गावर धुळ्याकडून (एम.एच.३९-सी.३१२२) व (एम.एच.३९-सी.२८२२) या दोन टँकरमध्ये संशयास्पद पेट्रोलियम पदार्थाची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती, पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांना मिळाली होती. त्यामुळे पोलिस कर्मचारी इकबाल शेख व नाना पवार यांनी टँकर चालक जावेदखान हमीदखान पठाण व दिनेश विल्या गावित (रा.नवापूर) यांची चौकशी केली. त्याला समाधानकार उत्तर न देता आल्यामुळे दोन्ही टँकर जप्त करण्यात आले आहेत.

यानंतर पुरवठा निरीक्षक व्ही.व्ही.गिरासे यांनी दोन्ही टँकरमधील द्रव्याचे नमुने घेऊन गुणवत्ता व निकष विभागाकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

Protected Content