दुकान फोडून पळणार्‍या चोराला सिनेस्टाईल पाठलाग करून अटक

रावेर प्रतिनिधी | शहरातील छोरीया मार्केटमधून रात्री दोनच्या सुमारास चोरी करून पळणार्‍या दोन चोरांना रावेर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून एकाला अटक केली असून एक फरार झाला आहे.

पोलिस सूत्रा कडून समजलेली माहीती अशी की रावेर शहरात मध्य रात्री दोनच्या सुमारास छोरीया मार्केट मध्ये दुकान फोडले रात्री शहरात पेट्रोलिंग करणारे पॉ को श्रीराम कांगने रात्रीच छोरीया मार्केटला गेले असता त्यांना दोन दुकाने फुटलेले दिसले. त्यांनी आस-पास शोध घेतला असता दोन जण पळतांना दिसले त्यांच्या सुमारे अर्धा किमी सिनेस्टाईल पाठलाग केला असता त्यातील एका चोरट्याला पकडण्यात रावेर पोलिसांना यश आले आहे.पकडलेला चोरटा मध्य प्रदेशच्या झिरण्याचा आहे.

या आरोपीच्या चौकशीतून दुसरा आरोपी देखील लवकरच ताब्यात येणार असल्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Protected Content