सातारा हिल हाफ मॅरॅथॉन जळगाव रनर्स ग्रुपच्या ६० धावपटूंनी केली पूर्ण

jalgaon runner group

जळगाव, प्रतिनिधी | जागतिक दर्जाची, अत्यंत कठीण सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये जळगाव रनर्स ग्रुपने यशस्वी सहभाग नोंदवला.

यात गीतेश मुंदडा, विवेक बागरी, सचिन मंडोरा, उमेश महाजन, अजित महाजन, हरगोविंद मणियार, राकेश गावंडे, सरपंच अनिल खडके, जितू रावलाणी, अनुप तेजवणी, श्याम कपुर, आदित्य खटोड, अनुप अग्रवाल, मयूर कासार, विजय शमनाणी, मिलन जैन, डॉ.भूषण झंवर, राजेश चोरडिया, विजय लाड, गणेश झंवर ,प्रेमलता सिंग यांच सह तब्बल ६० धावपटूंनी २१,की.मी.ची अल्ट्रा हॉफ मॅरॅथॉन पूर्ण केली. अत्यंत जोशपूर्ण आणि उत्साही वातावरणात ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पुणे,मुंबई येथील खेडाळूनी निर्विवाद वर्चस्व मिळवले. सातारा हिल अल्ट्राहॉफ मॅरेथॉनचे वैशिष्ट्य म्हणजे देशी-विदेशी नामांकित धावपटूचा सहभाग असतो. या मॅरॅथॉनमध्ये सातारा रनर्स व नागरिकांचा अक्टिव्ह  सहभाग . पारंपरिक वाद्यांचा गजराने चैतन्य निर्माण केले होते. स्वयंसेवी संस्थाकडून जनजागृती उदा.बेटी बचाव, पाणी वाचवा  आदीचा संदेश देण्यात आला.  अंध-अपंग खेडाळूचा सहभाग पहावयास मिळाला. रस्त्यांचा दुतर्फा स्वागतासठी नागरिकांची गर्दी केली होती. या स्पर्त्धेत ज्येष्ठ व महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला. अत्यंत नियोजनबद्ध व शिस्तीत योग्य मॅनेजमेंट सर्व रनर्सचे या अल्ट्रा हॉफ मॅरेथॉन मध्ये यशस्वी फिनिश केल्या बद्द्ल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Protected Content