आत्मिक समाधान हाच सर्वोच्च पुरस्कार : नीळकंठ गायकवाड (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी ।  आत्मिक समाधान हाच सर्वोच्च पुरस्कार असतो म्हणून कार्यकर्त्यांनी होणाऱ्या उपहासाकडे दुर्लक्ष करून दमछाक झाली तरी व्रतस्थपणे समाजसेवा करावी, असे प्रतिपादन केशव स्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अप्पासाहेब नीळकंठ गायकवाड यांनी केले. 

 

भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम पुस्तक भिशी समुहातर्फे मांगिलालजी नेत्रपेढी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करतांना गायकवाड बोलत होते. प्रमुख अतिथी निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर ,प्रकल्प प्रमुख सचिन चोरडीया, सहप्रमुख डॉ. धर्मेंद्र पाटील, नेत्रपेढी व चाईल्ड लाईन समन्वयक भानुदास येवलेकर, नेत्रपेढी व्यवस्थापिका राजश्री डोल्हारे उपस्थित होते. नेत्रपेढी सहप्रमुख नेत्रतज्ञ डॉ.धर्मेंद्र पाटील मार्गदर्शनात म्हणाले की, शिक्षक समाज परिवर्तनाचे अग्रदूत असतात. नेत्रदानाबाबत शिक्षकांनी समाज प्रबोधन सर्वस्तरीय व्यापक करावे असे भावनिक आवाहन डॉ.पाटील केले. प्रकल्प प्रमुख सचिन चोरडिया यांनी जैन समाजात नेत्रदान ही धार्मिक व सामाजिक चळवळ झाली आहे हे सोदाहरण सांगितले. अन्य धर्मातील सामाजिक कार्यकर्त्यांनी नेत्रदानाबाबत भावनिक जनप्रबोधन व्यापक केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.  डॉ.अब्दुल कलाम पुस्तक भिशी सभासदांचा दृष्टीदान दिनानिमित्त सामुहिक नेत्रदान संकल्पासह प्रचार व प्रसाराचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी  डॉ. ए .पी. जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशीतर्फे उपाध्यक्ष निळकंठ गायकवाड यांचा सत्कार राजकुमार गवळी, सुप्रसिद्ध कथालेखक दीपक तांबोळी यांच्या ” रंग हळव्या मनाचे ” या कथासंग्रहास राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार मिळाल्या प्रित्यर्थ निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांच्या हस्ते तसेच ‘ जागतिक चित्रकला फाउंडेशन ऑफिसर ‘ म्हणून कला शिक्षक सुनील दाभाडे यांची निवड झाल्याबद्दल डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मायक्रोमायसीस  नेत्र विकाराचे गांभिर्य महाराष्ट्र शासनाला प्रथमतः लक्षात आणून जनप्रबोधनाची अतुलनीय व्यापक चळवळ केल्याबद्दल डॉ. धर्मेंद्र पाटील यांचा विशेष हृद्य सत्कार पुस्तक भिशी जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांनी शाल श्रीफळ देऊन केला. विजय लुल्हे यांनी मरणोत्तर नेत्रदान संकल्प पत्र  नेत्रपेढी प्रकल्प प्रमुख सचिन चोरडिया व नेत्रपेढीचे प्रकल्प सहप्रमुख नेत्रतज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्याकडे १०१ संकल्पपत्रे सुपूर्द केली आणि पुस्तक भिशीचे उद्दिष्टे व कार्यप्रणालीसह भावी सामाजिक उपक्रम सांगितले.  कार्यक्रमास पतपेढीचे मदतनीस परेश शिखरवार यांच्यासह निधी फौंडेशनच्या अध्यक्षा  वैशाली विसपुते, यश विसपुते, शिवसेना उपशहरप्रमुख संगीता गवळी,  सरला खोंडे, मौलाना आझाद फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज भाई शेख,  शिवचित्रकार मिलिंद विचारे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भिशी मार्गदर्शक तथा प्रकाशक युवराज माळी, सक्रिय सभासद उषा सोनार, अंनिस कार्यकर्ते महेश शिंपी, चित्रकार सुनील दाभाडे, पंकज नाले यांनी सहकार्य केले.  सुत्रसंचालन ह.भ.प.मनोहर खोंडे यांनी केले तर आभार  सुनिल दाभाडे यांनी मानले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/865392691027624

 

Protected Content