एमआयएमच्या महानगराध्यक्षांना मारहाणप्रकरणी सहा जणांना अटक

jail

जळगाव प्रतिनिधी । एमआयएमचे महानगराध्यक्ष रैयान जहागिरदार यांच्यासह सहा जणांना पाच ते सहा जणांनी मारहाण करत धारदार शस्त्राने मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री उशीरा घडली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने सहा जणांना अटक केली असून पुढील तपासासाठी शनीपेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रजा कॉलनीतील रहिवासी खालीद शेख शब्बीर हे स्मशानभूमिजवळ रात्री 9 वाजता पादत्राणे विकत असतांना त्यांना संशयित आरोपी लोकेश विलास अत्तरदे, मोहन ईश्वर पाटील, हर्षल धर्मरत्न सोनावणे, विजय गणेश कांडेलकर, राहुल संजय पवार, सागर उर्फ दिनेश प्रभाकर दुसाने या पाच तरूणांची फुकटात बुट मागितले. याला नकार दिल्यानंतर अचानक पाच जणांनी खालीद यांना मारहाण करण्यात आली. ही घटना संपत नाही तोच यानंतर नेरी नाक्यावरील चिकू विक्रेते अबिद बिस्मिल्ला बागवान (वय- ३८) धंदा – फ्रुट विक्री, रा. कासमवाडी जळगाव हा चिकु विक्री करीत असतांना संशयितांनी न विचारता चिकु घेऊन जात असतांन हटकल्याने रागात येवून पाचही संशयितांनी यांच्यावरही हल्ला चढविला. शिवीगाळ, चापट बुक्यांनी मारहाण करून कपाळावर, कानावर, छातीवर, पोटावर चेहऱ्यावर मारून गंभीर दुखापत केली व ‘तेरेको हम छोडेंगे नही’ अशी धमकी देऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. इतक्यात तेथून जात असणारे एमआयएम पक्षाचे महानगराध्यक्ष रैयान जहागीरदार यांच्यावरही या तरूणांनी हल्ला चढविला. यासोबत रिझवान बागवान आणि एमआयएमचे तालुकाध्यक्ष जिया बागवान यांनाही मारहाण करण्यात आली. यात हे सहा जण जखमी झाले असून त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

याप्रकरणी शनी पेठ पोलीसात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज रविवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास सहा जणांना अटक करण्यात आले असून पाचही जणांना पुढील चौकशीसाठी शनीपेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान सोशल मिडीयावरील अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच सोशल मीडियावर अफवा प्रसारीत करून कायदा व सुव्यवस्था ला बाधा आणणाऱ्या समाज कंटकावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, इशार पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

Protected Content