जुना आसोदा व खेडी रोड परिसरात रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ

जळगाव प्रतिनिधी । शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील गोपाळपूरा, आसोदा रोड आणि जुना खेडी रोड परीसरातील रस्त्यांच्या कामांचे भूमीपूजन महापौर जयश्री महाजन आणि माजी महापौर भारती सोनवणे यांच्याहस्ते आज मंगळवारी २१ सप्टेंबर रोजी करण्यात आले.

जळगव शहर महापालिकेच्या दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत मंजूर झालेल्या निधीतून दोन कोटी रूपयांची निधी नुकताच महापालिकेला प्राप्त झाला आहे. त्यानुसार महिला बालकल्याण समिती सभापती रंजना सपकाळे यांच्या प्रभाग क्रमांक ३ मधील जुनाखेडी रोड यात गोपाळपूरा पासून ते सदगुरू शाळेपर्यंत तसेच जुना आसोदा रोडवरील गोपाळपुरा ते श्रीराम चौकापर्यंतच्या रस्त्यांच्या कामाला आज २१ सप्टेंबर रोजी पासून सुरूवात करण्यात आली आहे. या कामाचा शुभारंभ महापौर जयश्री महाजन, माजी महापौर भारती सोनवणे यांच्याहस्ते करण्यात आला. परिसरातील रहिवाशांना लवकरच चांगला रस्ता उपलब्ध होणार असल्याची भावना महिला बालकल्याण सभापती रंजनाताई  सपकाळे यांनी व्यक्त केली आहे. याप्रसंगी महिला बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक कैलास सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते भरत सपकाळे  नगरसेवक प्रवीण कोल्हे, दत्तू कोळी, नगरसेविका कांचनताई  सोनवणे, मीनाक्षीताई  पाटील यांच्यासह मनपा पदाधिकारी तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने  उपस्थिती होती.

 

 

 

 

Protected Content