ठाकरे सरकारची अजून सहामाही परिक्षाच झालीय ! : शरद पवार

मुंबई प्रतिनिधी । ठाकरे सरकारची अजून फक्त सहामाही व त्यातही लेखी परिक्षाच झाली असली तरी त्यांचे काम समाधानकारक असल्याचे प्रशस्तीपत्र शरद पवार यांनी दिले आहे. ते खा. संजय राऊत यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

खासदार संजय राऊत त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची विस्तृत मुलाखत घेतली असून याचा आज दुसरा भाग प्रकाशित करण्यात आला आहे. यात शरद पवार यांनी ठाकरे सरकारच्या कामकाजासह अनेक विषयांवर भाष्य केले आहे. यात संजय राऊत यांनी ठाकरे सरकारच्या कामाविषयी प्रश्‍न उपस्थित केला. राज्यातील राजकारण सहा महिन्यांपूर्वी आपण बदलून टाकलं. सहा महिने हा एक परीक्षेचा काळ असतो. जसं पूर्वी वार्षिक परीक्षा, सहामाही परीक्षा अन् मग प्रगतीपुस्तक येतं पालकांकडे. तसं सहा महिन्यांचं प्रगतीपुस्तक पालक म्हणून आपल्याकडं आलंय का?, असा प्रश्‍न राऊत यांनी विचारला.

 

यावर शरद पवार म्हणाले, ही जी परीक्षा आता झाली, ती संपूर्ण परीक्षा झाली असं मला वाटत नाही. त्या परीक्षेमधील प्रॅक्टिकलचा भाग अजूनही बाकी आहे. ही लेखी झाली आहे. लेखीमधील निकालावरून प्रॅक्टिकलमध्येही ते यशस्वी होतील, असं आता दिसतंय. त्यामुळे त्या सहा महिन्यांच्या कालखंडासंबंधी लगेचच पूर्ण निष्कर्ष काढणं योग्य नाही. पण त्याच्यावर संधी नाही, असंही म्हणणं योग्य नाही. राज्याच्या विचाराच्या दृष्टीनं या सहा महिन्यात येत्या परीक्षेत विद्यार्थी पास झालेला आहे आणि तो पुढची परीक्षा, पुढचे पेपर सहजपणानं पूर्ण करेल, असं शरद पवार म्हणाले. आपण हे मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबाबत सांगत आहात का? असा प्रश्‍न राऊत यांनी विचारला. त्यावर पवार म्हणाले,मुख्यमंत्री ठाकरे, शेवटी राज्यप्रमुख हा महत्त्वाचा असतो. त्याच्या खालची टीम काम करते, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, यात शरद पवार यांनी अन्य विषयांवरही भाष्य केले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राजकीय नेते आणि त्यांच्या कामगिरीबाबत पवार भरभरून बोलले. राऊत यांनी चीनचं संदर्भात भूमिकेबद्दल विचारलं असता पवार म्हणाले की, चीन प्रश्‍नाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन वेगळा कारण सामान्यपणे आपला विरोधक कोण किंवा शत्रू कोण याचा विचार करतो तेव्हा भरतीय मनात पहिल्यांदा पाकिस्तान येतो. मागील अनेक वर्षांपासून माझं मत आहे की पाकिस्तानपासून आपल्याला खरी चिंता नाही. पाकिस्तान आपल्या विचाराचा नाही, तो आपल्या हिताच्याविरोधात पावलं टाकतो हेही खरं आहे. मात्र लांब पल्ल्याच्या दृष्टीने विचार केल्यास आपल्या हितासंदर्भात खरं संकट निर्माण करण्याची ताकद, दृष्टी आणि कार्यक्रम फक्त चीनचा आहे. चीन हे आपल्या देशासमोरील मोठं संकट आहे, असं पवार म्हणाले.

तर, आज देशाला मनमोहन सिंह यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज असल्याचे पवार म्हणाले. कारण मनमोहन सिंग जेव्हा पहिल्यांदा केंद्रीय अर्थमंत्री झाले. तेव्हा त्या मंत्रिमंडळात मी होतो. मला माहिती आहे, त्यावेळी आर्थिक अडचणीतून आम्ही कसे जात होतो. पण मनमोहन सिंगांनी एक नवीन दिशा दिली. त्याला दोन कारण आहेत. मनमोहन सिंहांनंतर मी नरसिंहरावांना श्रेय देतो. कारण या दोघांनी नेहमीच्या चौकटीतला रस्ता बदलून वेगळ्या वळणावर गाडी नेली आणि संपूर्ण अर्थव्यवस्था सावरली असे शरद पवार म्हणाले.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !

वेबसाईट: https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

टेलिग्राम चॅनल : https://t.me/joinchat/AAAAAE-eyexYv4VIejc_qw

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

जळगाव । भुसावळ । चाळीसगाव । अमळनेर । पाचोरा । भडगाव । धरणगाव । पारोळा । एरंडोल । रावेर । यावल । बोदवड । मुक्ताईनगर । जामनेर । चोपडा या सर्व तालुक्यांमधील बातम्या । ब्रेकिंग न्यूज । मराठी न्यूज । मराठी ब्रेकींग न्यूज । खान्देश । खान्देश बातम्या । खान्देश न्यूज

jalgaon । bhusawal । chalisgaon । amalner । pachora । bhadgaon । dharangaon । parola । erandol । raver । yawal । bodvad । muktainavar । jamner । chopda । khandesh । breaking news । marathi breaking news । jalgaon news । bhusawal news । khandesh news । chalisgaon news

Protected Content