Home Cities जळगाव जळगाव जिल्हा काँग्रेसतर्फे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध

जळगाव जिल्हा काँग्रेसतर्फे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध

0
60

जळगाव प्रतिनिधी । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोदावरी हॉस्पिटल संदर्भात केलेल्या बेताल वक्तव्याचा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त केला. अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीपभैय्या पाटील यांनी दिली.

कोरोना महामारीच्या संकटकाळात आरोग्य यंत्रणांचे मनोबल खच्चीकरण करणारे वक्तव्य सातत्याने राजकीय नेत्यांकडून होत आहे. अशा वक्तव्यांमुळे डॉक्टर्स, परिचारक, स्टाफ हे व्यथित होत असल्याने त्याचा परिणाम रूग्णसेवेवर होण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा नुकताच दौरा झाला. त्यावेळी त्यांनी गोदावरी हॉस्पीटलमध्ये पैसे घेतले जात असल्याचा तथ्यहीन आरोप केले. जळगाव जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परीस्थीतीत जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत केलेल्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाशी संबंधित निराधार आरोप फडणवीस यांची आहे अशी माहिती ॲड. पाटील यांनी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील, आमदार शिरीष चौधरी, सचिव प्रदेश डी.जी.पाटील यांच्यासह सर्व आघाडीचे अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, सर्व जिल्हा व तालुका फ्रँटल, सेल प्रमुख, जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांनी फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध केला.


Protected Content

Play sound