राजस्थान प्रमाणेच महाराष्ट्र सरकारने ३ जानेवारी महिला शिक्षक दिन जाहीर करावा

धरणगाव, प्रतिनिधी । देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस ३ जानेवारी राजस्थान सरकारने महिला शिक्षक दिवसम्हणून साजरा केला. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने हा दिवस साजरा करावा अशी मागणी म.फुले ब्रिगेड तालुका अध्यक्ष नरेद्र(राजु)साहेबराव महाजन यांनी केली आहे.

आज ज्यांच्यामुळे प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत त्यांना या गोष्टीचा विसर पडू नये की, आपण कोणामुळे शिक्षण घेत आहोत. आपण कोणामुळे आज यापदावर कार्यरत आहेत. महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की ३ जानेवारी हा दिवस महिला शिक्षिका दिवस म्हणून घोषित कराच. तसेच सरकारी व खाजगी शाळांमध्ये व महाविद्यालयात महापुरुषांचे छायाचित्रे हे बंधनकारक झाले पाहिजे. ज्यांच्या विचारांवर या शाळा व महाविद्याल आहेत त्यांचेच छायाचित्रे नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशीदेखील मागणीतालुका अध्यक्ष नरेंद्र महाजन यांनी केली आहे.

Protected Content