मेंढी चराईसाठी क्षेत्र उपलब्ध करण्याची संदीप सावळे यांची मागणी

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यात मेंढी चराईसाठी क्षेत्र उपलब्ध करून द्यावे अशी मागणी ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन व आ. चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.

 

रावेर तालुक्यात  मोठ्या प्रमाणात मेंढी पालन व्यवसाय असुन मेंढी चराईसाठी क्षेत्र उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील मेंढपाळ बांधवांनी धनगर समाज नेता संदीप सावळे यांच्या नेतृत्वात ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन यांना रावेरात तर मुक्ताई नगर येथे जाऊन विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी दोन्ही लोकप्रतिनिधीनी धनगर समाजाचे समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे

 

रावेरात ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांना मेंढीचराई च्या संदर्भात क्षेत्र उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले.यावेळी  गिरीश महाजन यांनी धनगर समाजाच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. या महत्वाच्या विषयाचा नक्की पाठपुरावा करून मेंढीचराई चा प्रश्न सोडवू असे सांगितले.

 

याप्रसंगी  धनगर समाज संघर्ष समितीचे युवा प्रदेशाध्यक्ष संदिप सावळे यांच्यासह मेंढपाळ  पुना कारभारी, कोळपे दौलत कारभारी, सोना कारभारी तुकाराम कारभारी,वामन कारभारी, पुना कारभारी, चंदू कोळपे, बजा महाराज, चंदू नेमाने सदा नेमाने गुमन वडघर  गोपा दगडू कोळपे, खाना दगडू कोळपे, मोठ्या प्रमाणात धनगर मेंढपाळ बांधव उपस्थित होते.

Protected Content