एका महिन्यात कुटुंबातील दुसर्‍या कर्त्या पुरूषाचा मृत्यू ! : सरोदे कुटुंबावर वज्राघात

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी| चिनावल येथील ख्यातनाम सरोदे कुटुंबावर काळाने एका महिन्याच्या आत दुसर्‍यांदा घाला घातला अजून आज अनिरूध्द सरोदे यांचे निधन झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

चिनावल येथील सरोदे परिवारावर एका महिन्यात दुसरा दुःखाचा डोंगर कोसळला.जिल्हा मेडिसिन असोसिएशनचे सचिव अनिरुद्ध सरोदे रा. फैजपुर श्रीकृष्ण कॉलनी. (चिनावल) यांचे आज मंगळवारी सकाळी पाच वाजता दुःखद निधन झाले या निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सरोदे कुटुंबावर दिवाळी आधीच ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अनिरुद्ध सरोदे यांचे मोठे बंधू मसाकाचे माजी संचालक श्रीकांत सरोदे यांचे हृदयविकाराने निधन झाले.त्या मोठ्या दुःखातून संपूर्ण परिवार सावरत नाही अजून तितक्यात अजून आज भल्या पहाटे दुसरा मोठा दुःखाचा डोंगर सरोदे परिवारावर कोसळला.

अनिरुद्ध सिताराम सरोदे(बंडू दादा) राहणार फैजपूर श्रीकृष्ण कॉलनी (चिनावल) यांचे आज सकाळी भुसावळ येथील रिदम हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.अनिरुद्ध सरोदे यांच्यावर जळगाव जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सचिव म्हणून त्यांच्यावर जबाबदारी होती तसेच हिंदू धर्मकार्यात फैजपूरसह परिसरात अग्रेसर राहत होते.तरुणांच्या पाठीशी उभे राहणारे बंडू सरोदे यांची ओळख होती त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरलीआहे. आज सकाळी.चिनावल येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पश्चात एक लहान भाऊ, पत्नी, दोन मुले, वहिनी असा परिवार आहे.

Protected Content