वाळूची चोरटी वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या विनापरवाना वाळू वाहतुक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर जळगाव तालुका पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत दोन ट्रॅक्टर जप्त केले आहे. याप्रकरणी शुक्रवारी ७ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता ट्रॅक्टर चालकांसह मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करणयात आला आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, गिरणा नदीपात्रातून विना परावना अवैधरित्या वाळूचा उपसा करुन ते ट्रॅक्टरमधून वाहतुक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर मोहाडी ते धानोरा रोडवरील नागझिरी फाट्याजवळ तालुका पोलिसांच्या पथकाने पकडले. त्यांच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना असल्याबाबतची विचारणा करण्यात आली. परंतु त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा परवाना नसल्याने पोलिसांनी ते दोन्ही ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात जप्त केले. याप्रकरणी  शुक्रवारी ७ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता  पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोन्ही ट्रॅक्टररील चालकांसह मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना प्रकाश चिंचोरे व पोना अनिल फेगडे हे करीत आहे.

Protected Content