नंदु युवा मंचतर्फे शालेय साहित्य वाटप (व्हिडीओ)

shaley sahitya vatap

पाचोरा प्रतिनिधी । शहरातील भडगाव रोड येथील नंदू युवा मंचतर्फे नुकतेच गरीब व हातकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरात आदिवासी, भिल्ल, वडर अश्या समाजाच्या गोरगरीब मुलांना शाळेत शिकण्यासाठी शालेय साहित्य मिळत नसल्याने त्या गरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. ही बाब लक्षात घेत रक्षाबंधनानिमित्त त्या मुलांना शालेय स्कूल बॅग, केचपेन, कलर पेटी, कंपास बॉक्स व रजिस्टर वह्या असे साहित्य मोफत वाटप करण्यात आले. याआधी देखील नंदू शेजार मंचतर्फे दुष्काळ कार्यकाळात पाणी टंचाईची परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी स्वखर्चातून मोफत टाकी उभारून पाणीपुरवठा केला गेला होता. तसेच हिवाळ्यात थंडीमध्ये गोरगरिबांना थंडी वाजू नये, यासाठी ब्लॅंकेट शाल वाटप केले जाते. असे विविध उपक्रम मंचातर्फे राबविले जात असतात. कारण सर्वसामान्य गोरगरीब यांच्याकडे विविध राजकीय नेते व पदाधिकारी दुर्लक्ष करीत असून त्यासाठी समाजकार्य करण्याचे काम आम्ही नेहमी करत असतो. गोरगरिबांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न मंच ग्रुपतर्फे केला जात असतो. अशा प्रतिक्रिया अध्यक्ष नंदू शेलार यांनी सांगितले.

शहरात सामाजिक रचना पाहता सर्वधर्म समभाव तत्त्वाचे पालन करून सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी नंदू युवा-मंचतर्फे सर्व तरुण एकत्र येऊन सामाजिक दृष्टीकोनाच्या भावनेतून विविध उत्सव साजरे करत असतात. तसेच नुकतेचे स्वातंत्र्यदिन रक्षाबंधन अशावेळी सर्व मित्र परिवाराने एक दिलाने आर्थिक मदत जमा करत गोरगरिबांना शालेय साहित्य देत मदत केली आहे. यावेळी सामाजिक बांधिलकी जोपासली जात असल्याचे दिसत आहे. भविष्यात नंदू युवा मंचसारखे अनेक समाज तरुण समाजकार्य करण्यासाठी पुढाकार घेतील व यावेळी शंभर ते दीडशे गरीब विद्यार्थ्यांना दि. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधननिमित्त शालेय साहित्य वाटप नंदू युवा मंच तर्फे करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमात अध्यक्ष नंदू शेलार, अमोल सावंत, सोपान पाटील, बंटी गोसावी, बंटी चव्हाण, दिनेश पाटील, रोहित प्रजापत, निलेश मराठे, संदीप पवार, मुकेश राठोड, बंटी पाटील, नीलेश मराठे, रीतेश खैरनार, गणेश कोळी, जिभू पाटील, सागर पाटील, नाना राठौड़, सतिश गोसावी, आशिष पाटील, जयेश सोनार व धमौरे पाटील आदी उपस्थितीत होते.

Protected Content