रोहिणी खडसेंनी पुन्हा रूपाली चाकणकरांना डिवचले, म्हणाल्या. . . .!


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वैशाली हगवणे यांच्या क्रूर हत्येनंतर शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आज पुन्हा एकदा रूपाली चाकणकर यांना लक्ष्य करत त्यांच्यावर जोरदार टिका केली आहे.

शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आणि अजित पवार गटाच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यात नेहमीच राजकीय खडाजंगी सुरू असते. सध्या गाजत असलेल्या वैशाली हगवणे प्रकरणाने या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. या प्रकरणात त्यांनी सातत्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना टार्गेट करत टिका केली. तर चाकणकर यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, आज रोहिणी खडसे यांनी पुन्हा एकदा रूपाली चाकणकर यांना डिवचले आहे. या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या की, महिला आयोगाच्या अध्यक्षा या एका पक्षाच्या राजकीय पदाधिकारी देखील आहेत. यामुळे त्यांना काम करण्यासाठी कमी वेळ मिळत असेल. म्हणून राज्य महिला आयोगाला पूर्ण वेळ अध्यक्ष मिळावा अशी मागणी रोहिणी खडसे यांनी या ट्विटमधून केली आहे.