आक्षेपार्ह विधानाबाबत कठोर कारवाई करा : मुस्लीम समुदायाची मागणी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रेषीत मोहंमद (स.) यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पी. आर. शर्मिष्ठा या तरूणीच्या विरूध्द कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील मुस्लीम समुदायाच्या वतीने करण्यात आली आहे.

पुणे येथील काॅलेजची विद्यार्थिनी पी. आर. शर्मिष्ठा हिने प्रेषितांवर अभद्र विधाने केल्या बद्दल कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत अशी मागणी मुस्लिम समाजा तर्फे करण्यात आली. या निवेदनाच्या प्रति अमळनेरचे अतिरिक्त प्रांत अधिकारी नितीन कुमार मुंडावर यांच्या मार्फत माहामहिम राष्ट्रपति, भारताचे प्रधानमंत्री व गृहमंत्री, यांना देण्यात आल्या आहेत.

या निवेदनात पुढे म्हंटल आहे कि आम्हाला विश्वास आहे कि शासन प्रशासन या प्रकरणात योग्य ती कारवाई करून धार्मिक सालोखा रखण्यास हातभार लावेल. आम्ही सर्वाना धार्मिक सालोखा आणि परस्पर आदर वाढवण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन करतो. समाजात शांतता आणि सुव्यवस्था रखण्यासाठी आपन सर्वजण एकत्र काम करूं शकतो आसा आमचा विश्वास आहे.

दरम्यान हे निवेदन प्रांत अधिकारी नितिन कुमार मुंडावर यांना मौलाना रियाज़ शेख यांनी निवेदन सार्वजनिकरित्या वाचून दाखवली आणि ते स्वीकारल्यानंतर मुस्लिम समुदायात असलेल्या संतापाची माहिती दिली आणि शर्मिष्ठावर त्वरित कार्रवाई करण्याची मागणी केली. सदर निवेदन देतांना मौलाना रियाज़ शेख, इकबाल कुरेशी, अल्तमश शेख, आकिब अली, इमरान भाया, शाहरुख सिंगर, मोहसिन जडी बुटी, हाफीज़ तौसीफ, इमरान शेख हाजी कादर जनाब, फैजान शेख, रिज़वान मनियार,अफजान शेख आदि मान्यवर उपस्थित

Protected Content