मान्यवरांच्या उपस्थितीत हरीप्रकाश गोशाळेच्या शेडचे लोकार्पण


भुसावळ- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । साकेगाव शिवारातील श्री स्वामीनारायण ट्रस्टच्या हरीप्रकाश गोशाळेच्या शेडचे लोकार्पण आज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वस्त्रोद्योग मंत्री ना.संजय सावकारे, प.पू.के.के.शास्त्री, महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे सदस्य सुनिल सुर्यवंशी, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, पशुसंवर्धन सह आयुक्त खाचणे, प.पू.पी.पी. शास्त्री, धर्मस्वरूप शास्त्री, नायब तहसिलदार संतोष विनंते, विष्णुशास्त्री व ईश्वरदास शास्त्री उपस्थित होते.

यावेळी बोलतांना सुनिल सुर्यवंशी यांनी गाईचे दूध, गोमूत्र, शेण आदी घटकांचा आरोग्यासाठी कसा उपयोग होतो ह्याचे महत्त्व सांगितले. यावेळी पी.पी.शास्त्री, उमेश नेमाडे, ईश्वरदास शास्त्री यांनी आपल्या मनोगतात गायींची महती सांगून प्रत्येक जण गाय दारी सांभाळू शकत नसल्याने गोशाळा निर्माण झाल्याचे सांगितले. तसेच गोसेवा करण्याचे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश फेगडे यांनी केले. सूत्रसंचलन जळगांव स्वामीनारायण मंदिराचे नयनस्वामी यांनी तर आभार मनोज भोसले यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गोपाळ भगत, प.पू.राधास्वामी व श्री स्वामीनारायण गुरुकुलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग येईल कार्यक्रमासाठी महाराष्ट्र व गुजरात राज्यातून विविध संत मंडळी व गो सेवक तसेच नागरिक उपस्थित होते.