Home धर्म-समाज यावलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात 

यावलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात 


यावललाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती मोठ्या उत्साहात आणि जयभीमच्या घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात साजरी करण्यात आली. सर्वपक्षीय मान्यवरांच्या उपस्थितीत महामानवाला अभिवादन करण्यात आले असून शहरात एकात्मतेचे आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.

यावल शहरातील मुख्य बुरुज चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळा स्थळी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी रावेर-यावलचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे, लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छायाताई पाटील, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल वसंत पाटील, नगरसेवक उमेश फेगडे, माजी उपनगराध्यक्ष मुकेश येवले, भाजप ओबीसी विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष व नगरसेवक हेमराज उर्फ बाळासाहेब फेगडे, नगरसेवक रुबाब तडवी, नगरसेवक योगेश चौधरी, माजी नगरसेवक तथा आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे, भाजप यावल मंडळ अध्यक्ष सागर कोळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी, शिवसेना शिंदे गटाचे उपप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे व सविता अतुल भालेराव, काँग्रेसचे शहराध्यक्ष हकीम शेख मोहम्मद याकुब, नगरसेवक उमर कच्छी, नगरसेविका शालु भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेस (अ प) गटाचे कदीर खान, भाजयुवा मोर्चाचे भूषण फेगडे, काँग्रेसचे मजहर शेख, विर येवले यांच्यासह शेकडो भीमसैनिक उपस्थित होते.

यानंतर आठवडे बाजार, पंचशील नगर आणि बुरुज चौक येथून शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजरात आणि जयभीमच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. विष्णु पारधे, सागर गजरे, अनिल जंजाळे, युवराज सोनवणे, अरुण गजरे, राहुल गजरे, माजी नगरसेवक मनोहर सोनवणे यांच्यासह असंख्य भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

या संपूर्ण कार्यक्रमातून सामाजिक समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त करण्यात आली. विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन केले, ज्यामुळे शहरात एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले.


Protected Content

Play sound