पोलीस निलेश चव्हाणच्या मागावर : पिस्तुलासह नाचतांना व्हिडीओ ‘व्हायरल’ !

पुणे-वृत्तसेवा | हगवणे कुटुंबाला धमकावणाऱ्या निलेश चव्हाणचा पिस्तुलासह मस्ती करणारा व्हिडीओ सोशल मीडियात ‘व्हायरल’ झाला असतांनाच पोलीस त्याच्या मागावर असल्याचे वृत्त आहे.
संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या वैशाली हगवणे यांच्या प्रकरणात आता निलेश चव्हाण या गुंडाची एंट्री झाली आहे. यामुळे आता पोलीस त्याच्या मागावर आहेत. त्यानेच वैशाली हगवणे यांच्या मुलाला तिच्या माहेरच्या मंडळीला सुपुर्द केले. अर्थात, याप्रसंगी त्याने पिस्तुल दाखवून त्यांना धमकावले देखील होते. यामुळे त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातच आत त्याचा पिस्तुलासह माज दाखवतांनाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात तो कमरेला पिस्तुल लाऊन नाचतांचा दिसत आहे.
दरम्यान, निलेश चव्हाण याचा पोलीस कसून तपास करत आहेत. तर काही वृत्त वाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार तो आज सायंकाळपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याची शक्यता देखील आहे. तर निलेश चव्हाण याच्या क्रूर कृत्यामुळे समाजात संतापाची लाट उसळली असून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.